पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालयाकडून 2439 किलो अंमली पदार्थ नष्ट

447 0

आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42 हजार 054 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ, 17 लाख 10 हजार 845 गोळ्या, 72 हजार 757 कफ सिरपच्या बाटल्या आणि 16 हजार 336 इंजेक्शनच्या कुपी नष्ट केल्या. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करी विरुद्ध एक मजबूत संदेश देण्यासाठी 8 जून 2022 रोजी समन्वयित पद्धतीने या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

याच कार्यवाहीचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची पूर्व-चाचणी विल्हेवाट लावली. हा सर्व जप्त मुद्देमाल मेसर्स. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव यांच्या परिसरात अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन आधारित भस्मीकरण सुविधेवर नष्ट करण्यात आला. यावेळी मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र समन्वयक डॉ. सोनाली काळे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. या कार्यक्रमात देशभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोग आणि तस्करीविरूद्ध मजबूत संदेश देण्यासाठी आभासी पद्धतीने या समन्वयित कार्यवाहीमध्ये भाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!