औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण कधी होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

223 0

मला अनेकजण विचारतात, की औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? नाव काय हो ते कधीही बदलू शकतो पण मला सर्व सोईंनी परिपूर्ण असं संभाजीनगर करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

याच मुद्द्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी  सूचक विधान केलं असून औरंगाबादचं नामकरण होणार हे नामकरण मीच करणार असं त्यांनी म्हटलं आहे.

उध्दव ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. हे मी विसरलेलो नाही आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केल्याशिवाय मी राहणार नाही. याची सुरुवात करण्यात आली आहे. चिखलठाण येथे होणाऱ्या विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याबाबतचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. कॅबिनेटने देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!