पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेची उमेदवारी मिळवलेल्या उमा खापरे आहेत तरी कोण ?

326 0

मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना डावलून पिंपरी-चिंचवडच्या उमा खापरे यांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या उमा खापरे आहेत तरी कोण ?

उमा खापरे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या त्या समर्थक असून भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दोन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले आहे. 2001-2002 मध्ये पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवले आहे. महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव तर 2002 ते 2011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. 2017 ते 2020 या काळात त्या सोलापूरच्या प्रभारी होत्या. सध्या त्यांच्याकडे भाजप महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!