शुभदा सहस्रबुद्धे यांचे पुण्यात शुक्रवारपासून ‘कार्त दे विझीत’ चित्र प्रदर्शन

361 0

पुणे- चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांच्या ‘कार्त दे विझीत’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शुभदा सहस्रबुद्धे यांनी चारकोल माध्यमात रेखाटलेली १२० व्यक्तिचित्रे पाहता येणार आहेत.

या प्रदर्शनात विविध देशातील तेजस्वी मनांचा, धाडसी माणसांचा आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वांची व्यक्तिचित्रे रसिकांना पाहाता येणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ईरफान खान, सचिन तेंडुलकर, कपिलदेव, मधुबाला, श्रीदेवी, ओप्रा विन्फ्रे यांसारख्या देश -विदेशातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.

शुभदा सहस्रबुद्धे या २३ वर्षे अमेरिकेमध्ये होत्या. अमेरिकेमध्ये असताना सलग १४० दिवस त्यांनी विविध देशातील प्रभावी व्यक्तिमत्वांची चित्रे साकारली आहेत.
माझ्यासाठी या व्यक्तिमत्त्वांच्या चेह-यावरचे भाव यांना सर्वोच्च प्राधान्य होते, असे सहस्रबुद्धे म्हणाल्या.

Share This News
error: Content is protected !!