शिरूरमध्ये न्यायालय परिसरात माजी सैनिकाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू, सासू जखमी

569 0

पुणे – घटस्फोटाची केस सुरु असताना न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. या घटनेत एका माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सासूला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे.

दीपक पांडुरंग ढवळे (माजी सैनिक, राहणार अंबरनाथ, जिल्हा ठाणे) असे आरोपीचे नाव असून या घटनेत मंजुळा रंगनाथ झांबरे (राहणार वाडेगव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपी दीपक ढवळे आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरु होती. न्यायालयात पोटगीसाठी दावा सुरु होता. त्याच्या सुनावणीसाठी आई आणि मुलगी न्यायालयात आल्या होत्या. त्यावेळी दीपक ढवळे याने त्याच्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून पत्नी आणि तिच्या आईवर गोळीबार केला. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोळीबार केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. परंतु पोलिसांनी नाकाबंदी करुन त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या भावालाही पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शिरूर पोलीस पुढील तपस करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!