पुणे मनसेला धक्का ! मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

140 0

पुणे- पुण्यातील मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

“मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत” असं सांगत माझिरे यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.

“19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्याय त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का? असं म्हणत हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केलाय.

मी याबाबत वसंत मोरेंना मेसेज केला आहे, पण त्यांनी तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा बोलावं, की याच्यावर अन्याय होतोय. मुळात मी वसंत मोरे समर्थक असल्याने माझं माथाडी कामगार सेनेच शहराध्यक्ष पद काढून घेतलं का? असा सवाल यावेळी माझिरे यांनी विचारला आहे. तर, मी कोअर कमिटीलाच नको होतो, असा घणाघात करत माझिरे यांनी मनसे सोडली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!