महत्वाची बातमी ! सिद्धू मुसावाला यांची हत्या करणाऱ्या ८ पैकी दोघे शुटर पुण्यातील

807 0

 

पुणे- पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला याच्या हत्येबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता याबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली असून मुसावाला याची हत्या करण्यासाठी ८ शार्प शुटर बोलावण्यात आले होते. त्यापैकी २ जण पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पंजाब पोलिसांनी काल रात्रीच दोघांना पुण्यातून अटक केली आहे. या दोघांनी मुसावाला यांना मारले असावे असा पोलिसांना संशय आहे. त्यांना पंजाब मध्ये नेऊन कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.

सिद्धू मुसावाला यांच्या फातयेंसाठी तीन राज्यातून ८ शूटर्स ना बोलावण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबमधील, तिघे राजस्थानमधून तर दोघे महाराष्ट्रातील आहेत. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत.. दोन वर्षापासून दोघंही फरार आहेत. आता ते पंजाबमध्ये राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे.

काय आहे घटना ?

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी भरदिवसा जीपमधून जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. एकूण २३ जखमा त्यांच्या शरीराला आढळून आल्या होत्या.

Share This News
error: Content is protected !!