पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या दोन्ही भुयारी बोगद्यांचे काम पूर्ण

340 0

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गावर बोगदा खोदकामाचे शेवटच्या टप्प्यातील काम शनिवारी पूर्ण झाले.

भूमिगत मार्गासाठी स्वारगेट येथून दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी खोदकाम सुरू झाले होते. टीबीएम मुळा-2 मशीनद्वारे स्वारगेट ते बुधवार पेठ 2.75 कि.मी. बोगदा तयार करण्यासाठी अंदाजे 10 महिन्यांचा कालावधी लागला. बुधवार पेठ मेट्रो स्थानकातील “ब्रेक थ्रू’ चे अंतिम टप्यातील काम पूर्ण झाल्यामुळे मेट्रोच्या एकूण 12 कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम आता 100 टक्‍के पूर्ण झाले आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा भुयारी भाग हा अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचा भाग आहे. तांत्रिक कौशल्य आणि ठोस प्रकल्प व्यवस्थापनामुळे बोगद्याचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ट्रॅक्शनच्या कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!