शिवसेना नेते,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

536 0

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडाचे शिवसेनेचे आमदार माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून ते स्वतः या गाडीतून प्रवास करत होते.

सावंत हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या भूम-परंड्याहुन पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. पुणे – सोलापूर महामार्गवरील वरवंड येथे तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात जाला. या अपघातामधून तानाजी सावंत बालंबाल बजावले आहेत.

फक्त गाडीचं किरकोळ नुकसान झालंय. थोडक्यात मोठा अनर्थ या अपघातातून टळला. शनिवारी रात्री सावंत हे त्यांच्या मतदार संघातील एक कार्यक्रम आटोपून रात्री निघाले होते. पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघाताचं कारण नेमकं कारण कळू शकलेलं नाही. रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मात्र या अपघातातून सावंत थोडक्यात बचावल्यानं सुटकेचा निश्वास सोडलाय.

Share This News
error: Content is protected !!