दि. 2, 3 व 4 जून 2022 रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 18 टीम सहभागी झाल्या होत्या.
मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी प्राधिकरण येथे चुरशीच्या झालेल्या अंतीमफेरी मधील लढतीत चिंचवड वॉरियर्स या टीम ने बाजी मारली.
सहभागी झालेल्या सर्व टिम्स ने त्यांच्या जर्सीवर बाल भिक्षेकरी मुक्तीचा संदेश देणारे जर्सी घातलेले होते , तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सदर विषयावर बनवलेले पोस्टर्स रिक्षामध्ये लावण्यात आलेले असून त्यामाध्यमातून बाल भिक्षेकरी मुक्ती मोहिमेचा प्रसार करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन बघतोय रिक्षावाला चे फय्याज मोमीन, गोपाळ बांदल, पंकज कदम, संतोष उबाळे, सचिन वैराट,अल्ताफ शेख, सोनाली शेंडगे व इतरांनी केले होते.