पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता
नागरिकांना थेट लसीकरण केंद्रावर लस मिळणं शक्य होणार आहे. कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लसीकरण लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर लस मिळणे शक्य आहे. तसेच, महापालिकेची कविशिल्डची 68 तर कोव्हॉक्सिन साठी 68 लसीकरण केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत. अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. तसेच, कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे त्यामुळं नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम पाळावा असे आवाहन डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केलं.