ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण जीवनरजनी पुरस्कार’ जाहीर

467 0

मुंबई- मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा 2022’ येत्या 7 जून रोजी मुंबईत होणार आहे. यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षी ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे तर नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राजकारणातील, कलासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!