माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

350 0

पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महिला अधिकाऱ्याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष जगताप तळजाई वसाहत भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. जगताप त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात आले होते.

त्यावेळी पुरवठा निरीक्षक महिला अधिकारी कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलत होत्या. जगताप यांनी कार्यालयात आरडाओरडा केला. महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोकरी घालवण्याची धमकी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!