कभी खुशी कभी गम या चित्रपटात काजोल आणि शाहरुख यांच्या मुलाची भूमिका ज्याने साकारली तो बालकलाकार पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. ‘कभी खुशी कभी गम’ मधील क्रिशच्या भूमिकेत दिसलेला जिब्रान खान आता आगामी चित्रपट ‘इश्क विश्क’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
शाहिद कपूर आणि अमृता रावचा ‘इश्क विश्क’ हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता जिब्रान खान मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्यांनी अजून ही दोन ते तीन चित्रपटात काम केलं आहे. क्यूँ की मै झूट नही बोलता, रिश्ते यांमध्येही दिसला आहे. ‘महाभारत’ या मालिकेत जिब्रानचे वडील फिरोज खान यांनी अर्जुनाची भूमिका साकारली आहे. खूप वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा एकदा जिब्रान चित्रपटात दिसणार आहे.