Crime

कचरा वेचणाऱ्यांवर उकळते पाणी ओतले. दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सासवडमधील घटना

619 0

पुणे- पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतले. यामध्ये तिघेजण भाजून गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित हॉटेल चालक फरार झाला आहे. या घटनेच्या प्रकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ही घटना २३ मे रोजी दुपारी घडली. हॉटेलचालक निलेश उर्फ पप्पू जगताप याने हे कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेत शेवंताबाई (वय ६०) यांचा मृत्यू झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला शेवंताबाई यांना घटनेची माहिती विचारत असल्याचे निदर्शनास आले आहे. व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये एक इसम बेशुद्धावस्थेत पायऱ्यावर निपचित पडल्याचं दिसून येत आहे. या इसमाच्या हातावर आणि शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्याचे आणि भाजलेल्याचे दिसून येत आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून संबंधित हॉटेल चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र पोलिसांवर स्थानिक आमदारांचा दबाव असल्याचाही आरोप केला जातोय.

घटनेची चौकशी करा – विजय शिवतारे

शिवसेने नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना अमानुष घडली. खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांना याप्रकरणी दबाब असल्याचा आरोप शिवतारे यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!