सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय

267 0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नुकतेच विद्यापीठातर्फे श्री माळी यांनी या जागेचे अलॉटमेंट लेटर देण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्यालय सुरु करण्याबाबत यापूर्वी मान्यता घेण्यात आली होती. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाने रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशनसाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली. नुकतेच विद्यापीठातर्फे श्री माळी यांनी या जागेचे अलॉटमेंट लेटर रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे परशूराम वाडेकर व ॲड मंदार जोशी यांनी स्वीकारले. या कामासाठी राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्य राजेश पांडे, मा कुलगुरू नितीन करमाळकर, रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार, विजय खरे यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती मंदारभौ जोशी यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या जागेची पाहणी केली होती. लवकरच या जागचे नूतनीकरण करण्यात येणार असून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे कार्यालय सदैव कटिबध्द असेल अशी ग्वाही परशूराम वाडेकर व ॲड मंदार जोशी यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!