पुण्यात ‘आप’चा कार्यकर्ता मेळावा; पुणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

259 0

राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे.

पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. आप पक्षाकडून पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.

या मेळाव्याला दिल्ली सरकारमधील ‘आप’चे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रीती मेनन, निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांचीही उपस्थिती असणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याच्या माध्यमातून आप पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!