महत्वाची बातमी ! सचिन वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार

497 0

मुंबई- बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझेने १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला सशर्त मंजुरी देण्यात आली आहे.

सचिन वाझेला आज सीबीआयच्या विशेष कोर्टापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. सचिन वाझेने ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले होते. ‘या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो’, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले होते. त्यानुसार, न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घेत सचिन वाझेच्या अर्जाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझे याला सर्व तरतुदी आणि कायदेशीर अति पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझे याचा अर्ज स्वीकारल्याने आता त्याचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपीविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!