सवलतीत कर भरण्यासाठी पुणे महापालिकेकडून 3 दिवसांची मुदतवाढ

301 0

पुणे – सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेकडून ३१ मे ची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपण्याच्या दोन ते तीन दिवस आधी मिळकतकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक नागरिकांना कर भरता आला नाही. नागरिकांची झालेली गैरसोय पहाता पुणे महापालिकेने सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी 3 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

मुदत संपण्याच्या दोन ते तीन दिवस आधी मिळकतकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक नागरिकांना कर भरता आला नाही. महापालिका प्रशासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर महापालिका आयुक्तांनी ही 3 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 31 मे अखेर पर्यंत पालिकेच्या तिजोरीत विक्रमी 939.89 कोटींचा कर जमा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून या एप्रील आणि मे महिन्यात सुमारे 1 हजार कोटींच्या कर उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते पूर्ण झाले नसले तरी महापालिकेस मिळालेले हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत अडीचशें कोटीं पेक्षा अधिक आहे.

महापालिकेने दिलेल्या मुदतीत सुमारे 5 लाख 93 हजार 270 मिळकतधारकांनी 939 कोटी 89 लाख कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. तर नागरिकांना महापालिकेने 19 कोटी 21 लाख रूपयांची सवलत दिलेली आहे. दरम्यान, महापालिकेच्या मिळकतकराचा सर्व्हर शेवटच्या काही दिवसांमध्ये डाऊन असल्याने अनेक पुणेकरांना कर भरता आला नव्हता.

Share This News
error: Content is protected !!