पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना थेरगाव येथे घडली. बाहुलीशी खेळत असताना त्याने आपल्या बाहुलीला फाशी दिली. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला.
कमल खेम साऊद असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी त्याची आई नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होती. त्यावेळी कमल त्याच्या आवडत्या बाहुली बरोबर खेळत होता.
दरम्यान, त्याने खेळत असताना आपल्या बाहुलीला फाशी दिली. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. कमलला मोबाईलवर ‘हॉरर’ फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
घरातील कामं उरकल्यानंतर आई बाहेरच्या खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगतले जात आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.
मृत कमल दोन्ही मुलांपेक्षा वयाने मोठा आणि हुशार होता. आई कामात असताना तोच लहान भावंडाना सांभाळत होता. रविवारी दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, पोटाचा गोळा फासावर लटकलेले भीतीदायक चित्र नजरेस पडले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.