आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर कुठल्याही पक्षानं संभाजीराजेंबाबत ठोस भूमिका न घेतल्यानं त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली.

पण यासर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शाहू छत्रपतींच्या विधानावर अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.