महेश मांजरेकर यांच्या ‘वीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक सादर (व्हिडिओ)

350 0

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता रणदीप हुडा याने ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारली आहे. पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ असे लिहिले आहे. ऑगस्ट 2022पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!