राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन, उदय सामंत यांची घोषणा

355 0

मुंबई- राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट निवळल्यामुळे आता यापुढे विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होणार आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण ऑनलाईन सुरु होते. परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात येत होत्या. आता कोरोनाचे संकट दूर झालेले आहे. मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत होते. आता विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

ऑनलाईन शिक्षणाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वेळ अपुरा पडू नये यासाठी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न झाला होता.

Share This News
error: Content is protected !!