Breaking News ! उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

473 0

मुंबई- पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना काल, गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर आता अविनाश भोसलेंची रवानगी सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी ते नजरकैदेमध्ये असणार आहेत. या गेस्टहाऊसमध्ये अविनाश भोसेल यांना त्यांचे वकील आणि परिवारातील एका सदस्याला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्या वकिलांना दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान त्यांना भेटू देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोण आहेत अविनाश भोसले ?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली.

पुण्यातील बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस बंगला आहे. हाऊसच्या टेरेसवर भोसलेंच्या मालकीचं हेलिकॉप्टरदेखील आहे. रिक्षा व्यवसाय ते स्वत:चं हेलिकॉप्टर हा भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत त्यांना हा प्रवास केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!