देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

304 0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यावरून विरोधी पक्षांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

‘कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा’ असे विधान पाटील यांनी केले होते.

याच वक्तव्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.

नाना पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात खरं तर स्वयंपाक करणे यात कमीपणा नाहीच! संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळणारी प्रत्येक गृहिणी ही तेवढीच महान आहे, परंतु चंद्रकांत पाटील यांनी ज्या हीन स्वरात टीका केली ते अतिशय लज्जास्पद आहे.

 

Share This News
error: Content is protected !!