मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा; शेअर केली भावूक पोस्ट

450 0

पुणे- नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विटर वर आपल्या वडिलांच्या सायकलचा फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आपल्या वडिलांची आठवण काढत या सायकलची सर ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या गाड्यांना नाही, असे भावनिक उद्गार काढले आहेत.

वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे धडाडीचे नेते आहेत. अलीकडेच राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या आवाहनावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. मी नेहेमी ‘राज’मार्गावरच राहणार असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.

वसंत मोरे यांनी शेअर केलेल्या या पोस्टमधून त्यांनी वडिलांची आठवण असलेल्या सायकलचा फोटो शेअर केला आहे. या सायकलच्या कॅरियरवर बसून प्रवास केला आहे. या फोटोत असलेल्या सायकल वर एक कुऱ्हाड देखील दिसत आहे. माझ्याकडे आज खूप महागड्या गाड्या आहेत पण आज त्या गाड्यांमध्ये बसण्यासाठी माझे वडील हयात नाहीये. त्यांची 30 वर्षांपूर्वीची सायकल मी आजही जपून ठेवली आहे असेही मोरे म्हणतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!