राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

240 0

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय “संजय पवार आणि मी गुरुवारी दुपारी १ वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यामुळे सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्याची गरज नाही. पवारांच नाव फायनल झाले आहेत, असे राऊत यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले होते.

सेनेने दुसऱ्या उमेदवाराच्या घोषणेमुळे संभाजीराजे छत्रपतींची आशा मावळल्या आहेत. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी संभाजीराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेतली होती. मात्र, संभाजीराजे आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भुमिकेवर ठाम होते. त्यानंतर शिवसेनेने आपल्या दुसऱ्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली होती.

‘मी जनतेशी बांधील’ संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर केला असून यामध्ये संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले आहेत. यामध्ये संभाजीराजे म्हणतात, ” महाराज…
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…

मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी…
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!