धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

422 0

नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. आर के धकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलांना थॅलेसेमिया या गंभीर रक्ताचा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या चिमुकल्यांना कुठल्यातरी ‘ब्लड बँके’तून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली. या चौघांचे रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!