पुण्यात भाजपा राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास भाजपा पदाधिकऱ्यांकडून मारहाण

341 0

पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आप्पा जाधव जाधव यांना  मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी भाजपच्या माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह 15 ते 20 जणांवर  विश्रामबाग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या तणावात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे दिसू लागले आहे.

अप्पा जाधव यांचे नारायण पेठेत हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळेत जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे हे त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आले.

त्याने जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण केली.  भाजपाचे पुणे शहर कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांना देखील अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!