संजय दत्त याने आपले वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. सन 2005 मध्ये सुनील दत्त यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र अभिनेते संजय दत्त यांनी सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख बनवली. वेगवेगळ्या भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात जागा बनवली. संजय दत्तने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने एक भावनिक पोस्ट शेअर करून भावना व्यक्त केली.
“मला नेहेमी मार्गदर्शन केले तसेच माझं संरक्षण देखील केले. मला नेहेमी प्रेरित केले, आधार दिला. तुम्ही माझी शक्ती होते. तुम्ही माझ्या हृदयात नेहेमी राहाल,” असे संजय दत्त याने त्याचा आणि वडिलांचं फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे.