नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.
विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी गेल्या आठवड्यात यासिन मलिकला दोषी ठरवले होते. कोटनि एनआयएला त्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यास सांगितले होते. म्हणजे त्याला किती दंडाची शिक्षा करायची हे ठरवता येणार आहे. मलिकला जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशी होऊ शकते. तर कमीत कमी शिक्षा म्हणजे जन्मठेप होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यासिन मलिकच्या शिक्षेवरून कोर्टात जोरदार सुनावणी झाली. मलिक याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी एनआयएने कोर्टाला केली आहे. त्यामुळे मलिकला देहदंडाची शिक्षा होते की जन्मठेपेची शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासिन मलिक हा जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता आहे. त्याला टेरर फडिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने आपल्यावरील सर्व आरोपांची कबुलीही दिली होती. त्याला यूएपीए कायद्याखाली अटक केली आहे . सध्या तो दिल्लीच्या विहार तुरुंगात आहे.