मुंबई- मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे आता मुंबईत बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिस मुख्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. १५ दिवसानंतर या नियमाचा भांग करणाऱ्या वाहनचालकाच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक असेल, पुढील पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकीस्वाराचा 3 महिन्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
कायदा काय आहे ?
हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.