खिलाडी अक्षयकुमारने असे काय काम केले म्हणून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मानले आभार ?

443 0

अभिनेता अक्षय कुमार याच्या सामाजिक जबाबदारी बद्दल सर्वाना माहित आहे. तो नेहमीच आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा हा समाजासाठी देत असतो. असेच एक अभिमानास्पद काम अक्षयकुमार याने केले आहे. या कामाबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी त्याचे आभार मानले आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. नर्मदा पार्कपासून अशोका गार्डन, परिहार चौराहा, मन्वा देवी मंदिरपर्यंत शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: बालवाडीतील मुलांसाठीच्या उपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा केल्या आहेत.

या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय कुमारने बालवाडीतील मुलांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार खिलाडी कुमारने एक कोटी रुपये देण्याचा आणि 50 बालवाड्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे.

अक्षय कुमार काही दिवसांपूर्वीच ‘सेल्फी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटला होता. ‘सेल्फी’ सिनेमाचे शूटिंग भोपाळमध्ये झाले आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी पृथ्वीराज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘पृथ्वीराज’ या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. अक्षय कुमारनं या सिनेमात ‘पृथ्वीराज’ ही प्रमुख भूमिका साकारली असून मानुषी छिल्लरने संयोगिता ही भूमिका साकारली आहे.

Share This News
error: Content is protected !!