तारकर्ली बोट घटनेत पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू

290 0

मालवण- तारकर्ली येथे झालेल्या बोट दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा समुद्रात बुडून दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी मालवण जवळील तारकर्ली समुद्र किनाऱ्याजवळ घडली.

डॉ. पिसे उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आपल्या कुटुंबासह पर्यटनाला गेले होते. तारकर्ली बीचवर सकाळी २० जणांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी जय गजानन बोट समुद्रात गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथू परत येताना समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक बोट उलटली. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share This News
error: Content is protected !!