आयकर विभागाच्या छापेमारीनंतर यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स

208 0

मुंबई- शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स आले आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीकडून फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. या कारवाईत यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या. तसेच भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधव यांच्यावर केला होता.

यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!