Chhath Puja in Pune and Pimpri-Chinchwad:बिहार फाउंडेशनने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील छठ पूजेच्या ३० प्रमुख ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामुळे भाविकांना पारंपारिक उत्साहात हा उत्सव (Chhath Puja in Pune and Pimpri-Chinchwad) साजरा करणे सोपे झाले आहे. फाउंडेशनच्या माहितीनुसार, या वर्षी ३० हून अधिक ठिकाणी छठ पूजा आयोजित केली जाणार आहे. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औंध, पिंपरी, भोसरी, काळेवाडी, चिंचवड, कर्वे नगर, वाघोली, लोहगाव, मुंढवा, बाणेर आणि भुगाव या प्रमुख भागांचा समावेश आहे. पावनेश्वर घाट (पिंपरी), झुलेलाल घाट (पिंपरी) आणि गणेश तलाव (प्राधिकरण) यांसारख्या मोठ्या घाटांवर सायंकाळचे अर्घ्य आणि सकाळचे विधी यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
कसे आहे व्यवस्थापन?
छठ पूजेच्या आयोजनासाठी प्रत्येक ठिकाणी स्थानिक समन्वयक आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे, जे संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतील. नदी-घाटांवर किंवा कृत्रिम जलस्रोतांजवळ स्वच्छता, (Chhath Puja in Pune and Pimpri-Chinchwad) प्रकाशयोजना आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
पुणे शहराव्यतिरिक्त रावेत, तळेगाव, उंड्री, आणि वाघोली यांसारख्या प्रमुख निवासी क्षेत्रांमध्येही सामूहिक उत्सवाची तयारी सुरू आहे. फाउंडेशनने प्रत्येक ठिकाणच्या आयोजकांचे संपर्क तपशील देखील शेअर केले आहेत, ज्यामुळे भाविकांना त्यांच्या जवळचे पूजा स्थळ शोधणे आणि विधींमध्ये सहभागी होणे शक्य होईल.
काय आहे छठ पूजेचे महत्त्व?
छठ पूजा हा बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. हा सण सूर्यदेव आणि त्यांची बहीण छठी मैया यांना समर्पित असून. हा चार दिवसांचा उत्सव आहे, ज्यात कठोर उपवास, (Chhath Puja in Pune and Pimpri-Chinchwad) पवित्र स्नान आणि सूर्योदय तसेच सूर्यास्तावेळी प्रार्थना केली जाते.
* नहाय-खाय (पहिले दिवस): या दिवशी भाविक पवित्र स्नान करतात आणि सात्विक भोजन ग्रहण करून उपवासाची सुरुवात करतात.
* खरना (दुसरा दिवस): दिवसभर निर्जला (पाण्याशिवाय) उपवास केला जातो आणि संध्याकाळी खीर (गूळ आणि तांदळाची), पोळी आणि फळे यांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. यानंतर ३६ तासांचा कठोर उपवास सुरू होतो.
* संध्या अर्घ्य (तिसरा दिवस): हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, जेव्हा भाविक नदी किंवा तलावात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करतात.
* उषा अर्घ्य (चौथा दिवस): पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो. हा विधी आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी केला जातो.
पुण्यात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय समुदायामुळे गेल्या काही वर्षांत या उत्सवाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.
विमानात मराठी बोलणाऱ्या महिलेशी वाद; AVINASH JADHAV, युट्युबर MAHI KHAN विरोधात आक्रमक
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख छठ पूजा स्थळे
- औंध
- पावनेश्वर घाट: पिंपरी
- कर्वे नगर
- झुलेलाल घाट: पिंपरी
- वाघोली
- गणेश तलाव: प्राधिकरण
- लोहगाव
- भोसरी
- मुंढवा
- काळेवाडी
- बाणेर
- चिंचवड
- भुगाव
- रावेत
- उंड्री
- तळेगाव
- वडाची वाडी