BigBoss Marathi 6 : दिव्या शिंदेची हकालपट्टी, टीमची पोस्ट चर्चेत

65 0

 

बिग बॉस मराठी 6 (BIG BOSS 6)हा शो सध्या मोठ्या वादात सापडला आहे. स्पर्धक दिव्या शिंदे(DIVYA SHINDE)हिची अचानक झालेली हकालपट्टी हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या निर्णयानंतर दिव्या काय प्रतिक्रिया देणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असतानाच तिच्या टीमकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

अभिनेता रितेश देशमुख (RITESH DESHMUKH)होस्ट करत असलेल्या या शोमध्ये एका टास्कदरम्यान मोठा वाद झाला. स्पर्धक तन्वी हिने दिव्याला नॉमिनेट केल्यानंतर दिव्या संतप्त झाली. याच रागातून तिने तन्वीला धमकी दिल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण बनले. प्रकरण गंभीर झाल्यानंतर बिग बॉसने दिव्याला तिची चूक मान्य करून माफी मागण्याची संधी दिली, मात्र दिव्या हिने माफी मागण्यास नकार दिला.

इतर सदस्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत बिग बॉसने(BIGBOSS) अखेर दिव्या शिंदेला तातडीने घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घरातील सदस्यांसह दिव्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

दरम्यान, दिव्या शिंदे(DIVYA SHINDE)हिच्या टीमकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये “खूप काही सांगायचं आहे” असा उल्लेख करण्यात आला असून, यामुळे दिव्या पुढे काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या ही पोस्ट आणि दिव्याची हकालपट्टी यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे .

 

Share This News
error: Content is protected !!