INTERNATIONAL YOGA DAY 2025: दैनंदिन तणाव दूर करणारे 6 प्रभावी योगासन
INTERNATIONAL YOGA DAY 2025: सध्याची जीवनशैली ही अत्यंत धावपळीची बनली आहे. कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव आणि डिजिटल युगाची अतीव्याप्ती या सगळ्यामुळे सध्याची लाईफस्टाईल ही अधिक तणावपूर्ण बनली आहे. या रोजच्या तणापुर्ण जीवनात ‘योग’ केवळ शारीरिक नाही तर मानसिक शांती आणि भावनिक संतुलन देण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात करता येतील असे काही योगासन याबाबतची माहिती घेणार आहोत.
पुढील आसनं आपल्याला तणावमुक्तीसाठी उपयोगी ठरतील. शिवाय दैनंदिन कामांमध्ये देखील या आसनांमुळे ऊर्जा मिळेल.
1) अर्धचंद्रासन
या आसनामध्ये शरीर ताणल्यामुळे आणि समतोल साधल्यामुळे पाठीच्या कण्याचा खालचा भाग, पोट आणि छातीसाठी हे आसन उपयुक्त आहे.
2)अधोमुखश्वानासन
या आसनामुळे पाठदुखी नाहीशी होते ताणतणाव आणि औदासीन्य कमी होते तसेच शरीराला एक ऊर्जा मिळते.
3) हस्तपादासन
या आसनानं गुडघ्या मागील स्नायू पाठीचा कणा आणि पोटातील अवयवांवर प्रभाव पडतो तसेच मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे तुम्हाला एक रिफ्रेशमेंट मिळेल.
4) कपालभाती
या प्राणायामाच्या प्रकारामुळे शरीरात चैतन्य निर्माण होते तणाव दूर होतो आणि वजन देखील कमी होण्यास मदत होते.
5)नाडीशोधन प्राणायाम
दोन्ही नासिकांमधून आलटून पालटून श्वास घेण्याच्या या प्रक्रियेत ऊर्जेचे सूक्ष्म मार्ग मोकळे होतात ऊर्जेचा प्रवाह सुधारला जातो तणाव दूर करण्यासाठी हा प्राणायाम उत्तम आहे.
6) भ्रामरी प्राणायाम
भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडण्याच्या या प्राणायामामुळे मज्जा संस्थेला आराम मिळतो. यामुळे क्रोध बेचैनी, निद्रानाश, रक्तदाब कमी होतो त्यामुळे शरीर आणि मेंदूचा ही ताण कमी होतो.
योगाच्या नियमित सरावामुळे शरीर निरोगी आणि मन तणाव मुक्त होते नव्या उत्साहाने आपण जगाला सामोरे जाऊ शकतो म्हणूनच योगासन आणि प्राणायामाच्या सहाय्याने रोज तुम्ही स्वतः मधील बदल अनुभवू शकता. मग उशीर कशाला? अजूनही योग तुमच्या जीवनामध्ये नसेल तर आज पासूनच सुरुवात करा. अशा विविध इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी.. आपला महाराष्ट्र! आपली बातमी
