WASHI NEWS:नवी मुंबईतील वाशीत भीषण आग,4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

49 0

नवी मुंबईतील वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागली या चार जणांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झालेत..

वाशीतील सेक्टर 14 एम जी कॉम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 10, 11, 12 व्या मजल्यावर आग लागली होती. दहाव्या मजल्यावर घरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू, तर 12 व्या मजल्यावर घरात आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री 12.40 च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11व्या आणि 12 व्या मजल्याला आगीने कवेत घेतले. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पुजा राजन (वय 39) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!