पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ महिन्यांपूर्वी अनावरण केलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

415 0

भारतीय नौदल दिनाचा औचित्य साधून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची बातमी समोर आली आहे.

ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तहसीलदार वर्षा झालटे यांनी या घटनेची माहिती नौदल विभागाला कळविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.

मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच आठ महिन्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं.

उशीर होऊ द्या पण….

दरम्यान ही घटना घडल्यानंतर माजी राज्यसभा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिले असून युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट – सिंधुदुर्ग येथे उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आज कोसळले. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढील प्रतिक्रिया दिली आहे.

“मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.”

तसेच, छत्रपती संभाजीराजे यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले पत्र देखील पोस्ट केले असून छत्रपती संभाजीराजे यांनी तेव्हाच हा पुतळा बदलण्याची मागणी केली असल्याचे उघडकीस आले आहे. तथापि, छत्रपती संभाजीराजे यांच्या या पत्रावर पंतप्रधान कार्यालयाने निराशाजनक भूमिका घेतल्यानेच आजचा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याचे बोलले जात आहे.

Share This News

Related Post

Crime

BREAKING NEWS: पिंपरी-चिंचवड शहरात गोळीबार; तरुणाचा मृत्यू

Posted by - December 2, 2022 0
गोळीबार आणि खुनाच्या घटनेने आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहर हादरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या…

उत्तराखंडमधील वृद्धेने आपली सर्व संपत्ती केली राहुल गांधी यांच्या नावावर

Posted by - April 4, 2022 0
डेहराडून- मधील एका 78 वर्षीय महिलेने आपली सगळी संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. 50 लाखाची…

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण

Posted by - September 13, 2022 0
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे…
Uday Kotak

Uday Kotak : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा

Posted by - September 2, 2023 0
उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला…
Flying Kiss

Flying Kiss : राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस; भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी संसदेतुन बाहेर पडताना फ्लाईंग किस (Flying Kiss) दिला असा आरोप भाजप नेत्या स्मृती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *